कांतारा चॅप्टर 1 थिएटरमधेच का पहावा याची ५ कारणं?
कांतारा चॅप्टर 1 सध्या रिलीज झाला आहे आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारली आहे. तर 2022 मधे कन्नड सिनेमा इंडस्ट्रीतून एक अनोखा स्टार जन्माला आला आणि त्यानं अख्या भारताला जवळपास "कांतारा" नावाच्या कलाकृतीतून वेडावून सोडलं. तर याच सिनेमाचा पुढील भाग आला आहे. तो थिएटरमधेच का पहावा याची काही खास कारण आहेत.
सर्वात प्रथम मुद्दा आहे, व्हिएफएक्सचा. व्हिएफएक्स काम इतकं उत्कृष्ट आहे कि तुम्हाला थिएटरमधे बसल्या बसल्या निसर्गाचा, जंगलाचा, त्या विश्वाचा प्रभाव जाणवतो. खासकरून तुम्ही थ्रीडीमधे पहालं तर याचं व्हिएफएक्स काम अधिक उठून दिसतं.
दुसरी बाब आहे ती म्हणजे, दिग्दर्शनाची. रिषभ शेट्टीचं दिग्दर्शन इतकं प्रभावी झालयं की अनेक प्रसंग तुमच्या ह्रदयाला भिडून मनात घर करून जातात. आणि वन्स मोअर सारख्या मनात भावना जागृत होतात.
तिसरा विषय येतो कथा आणि पटकथा अर्थात स्क्रीनप्लेचा. कथा अर्थातचं कर्नाटकातील लोककथा पण ती गुंतवून ठेवण्यासाठी जो टाईट आणि इंगेजींग पद्धतीने स्क्रिनप्ले लिहला आहे तो अफाट वाटतो.
चौथा महत्त्वाचा गाभा आहे, यातील ॲक्शन सिन्स. ॲक्शन सिक्वेन्स अगदी टॉप नॉच पातळीवरचे झाले आहेत. कित्येक ॲक्शनवर फक्त टाळ्या शिट्ट्या माराव्याश्या वाटत राहतात.
आणि पाचवा फॅक्टर म्हणजे, मोठ्या पडद्यावर हा सिनेमा तुम्ही विथ फॅमिली नक्कीच बघू शकता. या कथेची सुरूवात, मध्य अन शेवट सुद्धा योग्य नोटवर संपतो; त्यामुळे सिनेमाची लांबी २ तास ५० मिनीटे असूनही कुठेच सिनेमात बोरसुद्धा होत नाही. तर हा सिनेमा थिएटरमधेच पाहणार ना? कमेंट करुन नक्की कळवा.
Comments (0)
Facebook Comments (0)