पुण्यातलं रियल इस्टेट मार्केट कोसळत आहे! ही गोष्ट कितपत खरी खोटी?

पुण्यातलं रियल इस्टेट मार्केट कोसळत आहे! ही गोष्ट कितपत खरी खोटी?
पुण्यातलं रियल इस्टेट मार्केट कोसळत आहे! ही गोष्ट कितपत खरी खोटी?

गेल्या आठवड्याभरापासून पुण्यातील एका बातमीने बराचसा धुमाकूळ घातलेला पहायला मिळतो आहे. ही बातमी म्हणजे रियल इस्टेट मार्केटिंगच्या संदर्भातील आहे. या माहितीनुसार प्राथमिकरित्या असं समोर दिसत आहे कि, पुण्यातील रियल इस्टेट मार्केट कोसळत आहे. आता हे खरतं घडतयं का? याबाबत नेमक्या कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत? कोणत्या खोट्या याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आधीच उल्लेख केल्या प्रमाणे पुण्यातील रियल इस्टेट मार्केट कोसळत असल्याच्या बातम्या काही वेब पोर्टलवर अलीकडे पहायला मिळाल्या. झी बिझनेस, सीएनबीसी न्युज, न्युज डॉट आणि इतर न्युज वर देखील या गोष्टीचा विस्तार मांडण्यात आला आहे. तर पुण्याचे रिअल इस्टेट मार्केट खरोखर कोसळतंय का? याविषयीचा सविस्तर आढावा पाहुयात. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पुणे शहरात आयटी हब, स्टार्टअप्स आणि मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे येथे नेहमीच रिअल इस्टेट मार्केट तेजीत राहिले आहे. पण २०२५ मध्ये या मार्केटमध्ये थेट मंदी आलेली दिसून येते आहे. विक्रीत घट, वाढत्या किमती, घटणारे खरेदीदार – हे सगळे संकेत सांगतात की पुण्याच्या रिअल इस्टेटमध्ये काहीतरी बरोबर नाही. चला, या परिस्थितीचा डेटा आणि ट्रेंड्सच्या आधारे आढावा घेऊया.

▪️२०२५ मधील प्रमुख ट्रेंड्स जे मंदीचे संकेत देतात?

२०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत पुण्यातील निवासी मालमत्तांच्या विक्रीत जवळपास ३०% घट झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियानुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत १२,००० पेक्षा जास्त घरं कमी विकली गेली.
किमती वाढल्यामुळे मध्यमवर्गीय खरेदीदार बाजारातून बाहेर पडले. 

प्रॉपटायगरच्या डेटानुसार, एप्रिल ते जून २०२५ दरम्यान मुंबई आणि पुणे मिळून विक्रीत ३०% घट झाली, तर नवीन प्रोजेक्ट लाँचेस १५ तिमाहीतील नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. ₹२ ते ₹१० कोटींच्या घरांच्या सेगमेंटमध्ये इन्व्हेंटरी ५०% पेक्षा जास्त वाढली आहे. सामनाच्या एका अहवालानुसार, मुंबई-पुण्यात हजारो फ्लॅट्स विकले गेलेले नाहीत, विक्री २५-२७% घसरली आहे, पण किमती अजूनही खाली येत नाहीत.

▪️मुळ कारणे ज्यामुळे जाणवतयं का होतेय ही मंदी?

1. आयटी लेऑफ्स आणि आर्थिक अनिश्चितता
पुण्याची अर्थव्यवस्था आयटी क्षेत्रावर अवलंबून आहे. २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर लेऑफ्स झाल्याने घरांच्या मागणीत घट झाली आहे. नोकरीतील अस्थिरतेमुळे लोक खरेदी टाळत आहेत.


2. वाढलेल्या किमती आणि परवड न होणे
सरासरी किंमत ७% ने वाढली आहे, पण खरेदीदार कमी झाले. सामान्य खरेदीदारांना आता २० वर्षांचे कर्ज घेऊनही घर परवडत नाही. ब्लॅक मनी आणि स्पेक्युलेटर गुंतवणुकीमुळे बाजार असंतुलित झाला आहे.

3. प्रोजेक्ट मंजुरीत उशीर आणि इन्फ्रास्ट्रक्चर समस्या. 
पीसीएमसी परिसरातील पर्यावरण मंजुरी प्रक्रियेत विलंब झाल्याने अनेक प्रोजेक्ट्स अडकले आहेत. त्यामुळे पुरवठा असंतुलित झाला आहे.

4. ओव्हरसप्लाय (अति पुरवठा)
डेव्हलपर्सने प्रोजेक्ट कमी लाँचेस जरी केले, तरी आधीचे प्रोजेक्ट्स विकले गेलेले नाहीत. बाजारात उपलब्ध घरांचा साठा वाढतच आहे.

▪️यातून प्रश्न पडतो पुढे काय? मार्केट कितपत कोसळणार?

पुणे रियल इस्टेट मार्केट पूर्णपणे कोसळण्याची शक्यता कमी आहे. पुणे अजूनही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
मात्र, १५–२०% दरम्यानची करेक्शन (किंमतींतील घट) दिसू शकते, विशेषतः आयटी क्षेत्रातील अस्थिरता वाढल्यास. काही रिपोर्ट्सनुसार, पुढील तिमाहीत विक्री आणखी १५–१७% कमी होऊ शकते. तरीही, मेट्रो, एअरपोर्ट आणि सस्टेनेबल हाउसिंगसारख्या प्रोजेक्ट्समुळे दीर्घकालीन वाढीची शक्यता कायम आहे. खरेदीदारांसाठी ही वेळ 'स्मार्ट खरेदी'साठी योग्य असू शकते. काही ठिकाणी ३०% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतात. मात्र, EMI क्षमता आणि दीर्घकालीन स्थैर्य तपासा. पुनावळे, ताथावडे, हिंजवडी सारख्या विकसनशील भागात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे गुंतवणूकीच्या नजरेतून अल्पकालीन स्पेक्युलेशन टाळा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रीमियम प्रोजेक्ट्स निवडा. ₹१ कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांच्या सेगमेंटमध्ये रजिस्ट्रेशन वाढलेले दिसत आहेत.

सध्याचा आढावा पाहिला तर सांगता येईल की पुण्याचे रिअल इस्टेट मार्केट पुर्णत: कोसळत नाही, पण ते नक्कीच मंदावले आहे. तरीही, जागतिक मंदीचा किंवा मोठ्या प्रमाणात आयटी लेऑफ्सचा धोका कायम आहे. तर मंडळी एकुण गोष्टींच्या आधारे तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत कमेंट करुन आम्हाला नक्की कळवा.