मिशन 'ट्रेकिंग'अगेन
करा भटकंतीला सुरुवात
कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वच आर्थिक गणितं बिघडत गेली. शाळा असो, व्यापार असो सर्वच क्षेत्रात मरगळ आली. यात सर्वात मोठा फटका बसला तो पर्यटन क्षेत्राला आणि ओघाने पर्यटनप्रेमींना. भटकंती मग ते ट्रेकिंग असो व विविध ठिकाण पाहण्याची आवड 'अली लहर केली सफर' असा काहीसं होत. इतके दिवस घरात बसून कंटाळलेल्या पर्यटन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. गड किल्ल्यांवर सफारीसाठी जाण्यासाठी राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे तुमच्या भटकंतीला लागलेलं ग्रहण आता संपलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हे सर्व करत असताना आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काही निर्बंदही सरकारने लादले आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
१. ट्रेकिंग च्या एका ग्रुप मध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत .
२. ट्रेकिंग साठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांची स्क्रिनिंग टेस्ट आवश्यक.
३. मास्क वापरणे बंधनकारक.
४. स्थानिक व्यक्तींच्या घरात भोजन व राहणे टाळावे.
५. प्रत्येक ग्रुप च्या वेळांमध्ये फरक असावा.
६. गड चढताना व उतरताना सोशल डिस्टंसिन्ग असावे.
या सर्व नियमांचे पालन करत ट्रेकिंग चा आनंद घ्या व आपल्यामुळे गावातील इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही ना याची काळजी आपणच घायला हवी.
पावसाळा संपून मस्त थंडीची चाहूल लागायला लागली आहे. बरेच दिवसांपासून कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून टाकायची असेल तर बाहेर पडून भटकंती चा आनंद घ्या. भटकंती चा आनंद भटकल्याशिवाय मिळत नाही. भटकंती यावरून प्रख्यात लेखक शन्ना नवरे यांची 'उनाड दिवस' हि कथा आठवल्याशिवाय राहत नाही. रोजच्या जीवनातील ताणतणाव दूर सारून, तुमच्या जवळपासच्या शहरात, आवडत्या गड किल्ल्यांवर भटकंतीसाठी बाहेर पडा. महाबळेश्वर पाचगणी सारखी अनेक पर्यटन स्थळे राज्यसरकारने सुरु केली असल्याने सह्याद्रीच्या कुशीत, डोंगरमाथ्यावरील दाट धुक्याच्या व थंडीचा आनंद घेण्यासाठी तुम्हीपण सज्ज व्हा व पुन्हा नवीन उमेदीनं मिशन 'भटकंती' सुरुवात करा! हे सर्व करत असताना गर्दी होणार नाही याची काळजीही आपणच घेतली पाहिजे. नियमाचे पालन करत भटकंती चा आनंद घ्या ! सरकारने परवानगी जाहीर करताच अनेक पर्यटन प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पुण्यातली अभियांत्रिकीची विद्यार्थीनी असलेली मानसी सांगते,'' कोरोनामुळे घरात बसून खूप उदास वाटत होतं. आमचा भटकंती नावाचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा आम्ही जवळपासच्या किल्ल्यांवर ट्रेकिंग ला जात असतो. नवीन ठिकाणं एक्सप्लोर करतो. नवीन माणसं भेटतात, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. त्यामुळे अभ्यास करायलाही हूरुप येतो. आता याच वीकएंड ला आम्ही तापोळ्याला जायचं प्लॅन करत आहोत. खूप दिवसांनी मैत्रिणी एकत्र जमणार आहोत त्यामुळे खूप आनंद आहे पण कोरोनाच्या नियमांचे पालनही आम्ही करणार आहोत.''
Comments (0)
Facebook Comments (0)