Redmi Note 11 : 8GB RAM सह लॉन्च होऊ शकतो ?
स्मार्टफोन बनवणारी चीन येथील कंपनी शाओमी आपल्या रेडमी नोट सीरिजमधील नव्या जनरेशनमधील रेडमी नोट ११ लवकरच बाजारात लाँच करणार आहे. चीनमधील सोशल मीडिया Weibo वर कंपनीने रेडमी नोट ११ सीरिज लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. कंपनी नोव्हेंबरपूर्वी नोट ११ सीरिज लॉन्च करू शकते. अर्थात नवीन रेडमी नोट ११ आणि नोट ११ प्रो हे फोन बाजारात लाँच होण्यापूर्वीच त्यांची किंमत किती असू शकेल, याबाबतची माहिती लीक झाली आहे. शाओमी रेडमी नोट ११ सीरिजची किंमत किती असेल, याबाबतची माहिती लीक झाली आहे.
त्यानुसार रेडमी नोट ११ स्मार्टफोन हा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आणि 8GB RAM आणि 128GB स्टोरेज अशा दोन प्रकारामध्ये लाँच केला जाईल. रेडमी नोट ११ या स्मार्टफोनमधील 6GB RAM + 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १,१९९ युआन म्हणजे सुमारे १४,००० रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत १५९९ युआन म्हणजे सुमारे १८,५०० रुपये असू शकते. Tata ची SUV Tata Punch भारतात लाँच, जाणून घ्या जबरदस्त कार्सचे फीचर्स आणि किंमत तर, रेडमी नोट ११ प्रो स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यापैकी 6GB RAM + 128GB स्टोरेज फोनची किंमत १५९९ युआन म्हणजेच सुमारे १८,५०० रुपये असू शकते.
त्याचप्रमाणे, 8GB RAM + 128 GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १७९९ युआन म्हणजे सुमारे २०,९०० रुपये आणि 8GB RAM + 256 GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १९९९ युआन म्हणजेच सुमारे २३,३०० रुपये असू शकते.
दर्जेदार बॅटरी
आगामी रेडमी नोट ११ स्मार्टफोनमध्ये तुम्हाला LCD पॅनल मिळू शकते, जे 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. ऑप्टिक्सबद्दल बोलायचं झालं तर १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा फोनमध्ये मिळू शकतो. डिव्हाइसमध्ये मीडिया टेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
फोनला 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. गेल्या अनेक दिवसांपासून रेडमी नोट ११ सीरिज चर्चेत आहे. या फोनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फीचर्स बाबतची माहिती लीक झाली आहे. त्यामुळे हा फोन केव्हा लॉन्च होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Comments (0)
Facebook Comments (0)