स्मार्ट सारथी ॲपची सेवा तीन दिवस राहणार बंद

स्मार्ट सारथी ॲपची सेवा तीन दिवस राहणार बंद

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप आणि वेब पोर्टल हे अधिकृत स्मार्ट फोन ॲप आणि वेब पोर्टलची सेवा अद्ययावत करणासाठीच्या कारणामुळे २५ ते २७ मार्च २०२२ असे तीन दिवस तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे.

या ॲप आणि वेब पोर्टलची सेवा अद्ययावत करण्यासाठी त्याचे ईएसडीएस क्लाउडवरून महापालिकेच्या आयसीसीसी डेटा सेंटरच्या सर्व्हरवर स्थलांतर (मायग्रेशन) करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी ॲप आणि वेब पोर्टलची सेवा बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने २५ मार्च सकाळी ८ वाजल्यापासून २७  मार्च रात्री ९ वाजेपर्यंत पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप आणि वेब पोर्टलची सेवा तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही सेवा पूर्ववत सुरु करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.